गावाविषयी माहिती
पिंजाळ नदी पोशेरी – पाली हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे.पोशेरी.गावात पूर्वमुखी श्री बळांलेश्वर मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३१०० आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ०४ व माध्यमिक शाळा १ , अंगणवाडी केंद्रे ६ व व्यायामशाळा १,सभामंडप- ३ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०२३ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रुप ग्रामपंचायत पोशेरी- पाली ने खास गावासाठी नळयोजना राबविल्या असून गावातील १००% कुटुंब पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत. पिंजाळ
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून हरभरा, मुग ,तूर, वाल व उडीद, ही प्रमुख पिके घेतली जातात. तूर ,हरभरा , वाल या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात.
पोशेरी - पाली ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पोशेरी - पाली .गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १० सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
पोशेरी – पाली .गाव आज वाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
भौगोलिक स्थान
पोशेरी –पाली हे गाव वाडा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ८ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळ ८५८.७२ हे आर असून ग्रामपंचायतीमध्ये ४ वार्ड आहेत. एकूण ६८२ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ३१०० आहे. त्यामध्ये १५२५ पुरुष व १५७५ महिला यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगत अवघ्या पिंजाळ नदी असून ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ४०°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात ३०°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.
पोशेरी पाली .गाव भात शेती उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.
लोकजीवन
पोशेरी गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भात शेती व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
पोशेरी च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
संस्कृती व परंपरा
पोशेरी- पाली .गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम ,गोपाला काळा आयोजित केले जातात., गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी, यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.
यामुळे पोशेरी – पाली गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.
प्रेक्षणीय स्थळे
ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत गावदेवी मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
श्री बळांलेश्वर मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे पुरातन काळातील मंदिर आहे.
शेती क्षेत्र – पोशेरी – पाली येथे भात शेती उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेते, शेती पाहण्याजोगी आहे.